सतीश वैजापूरकर
पत्रकार
राहाता-शिर्डी
ता.६।१।२४
चेहरा थोडासा भाजला त्याची गोष्ट...
परवा रात्री दहाची वेळ,
झोपण्यापूर्वी वाफ घ्यावी म्हणून शेगडीवर पातेले ठेवले,
टाॅवेल डोक्यावर ठेऊन चेहरा पातेल्या जवळ न्यायचा आवकाश...
ठप्प आवाज, पातेल्यातले उकळते पाणी क्षणार्धात तोंडावर...
चेह-यावर घाईने गार पाणी शिंपडले....
समोरचे दिसते म्हणजे डोळे शाबुत आहेत म्हणायचे...
डोळे वाचल्याचा आनंद एवढा मोठी की,
भाजल्याने तोंडावर डाग आणि व्रण पडले तर काय होईल हि चिंता या आनंदाने पार दुर भिरकावून दिली...
मुलांनी बर्नाल मलम घाईने आणला...
तो भाजलेल्या जागी फासला...
भाजल्याने होणारी आग क्षणात थांबली...
धाकटा भाऊ सुनील, पुतण्या प्रसाद अन प्रज्वल, चिरंजीव शैलेश या सर्वांचे उपचारासाठी पुण्याला जायचे यावर एकमत...
काल सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे गाठले....
नेत्ररोग तज्ञांनी डोळे शाबुत असल्याचे सर्टिफिकेट दिले...
अनुभवी प्लॅस्टीक सर्जन डाॅ.संदिप नाफाडे यांची अपाॅइंटमेंट...
तुटून बाजुला पडलेला हात जोडण्याची यशस्वी शस्त्रक्रीया केल्याने टाईम्स आॅफ इंडीयाच्या पहिल्या पानावर डाॅ.नाफाडे झळकले होते....
शिवाय ते मुळचे श्रीरामपुरचे....
पुतण्या प्रज्वल वर त्यांनी असेच यशस्वी उपचार केले होते...
आॅपरेशन थिएटर....
डाॅ.नाफाडे म्हणाले, जखमा खोल नाहीत, तुम्ही लगेच पाण्याने चेहरा धुतलात, लगेच इकडे आलात या जमेच्या बाजू आहेत...
भाजलेल्या जागेपूरती भुल..
जखमा स्वच्छ करून त्यावर कोलाजेन(कृत्रिम त्वचा) चिकटवले....
अर्धातासात आॅपरेशन थिएटरच्या बाहेर...
डाॅ.नाफाडे म्हणाले, आठ दहा दिवस घरी थांबा...
गाठी भेटी आणि संपर्क टाळा...
वैशालीत नाश्ता करून आम्हा सर्वांचे सायंकाळी पाचच्या सुमारास घराकडे प्रयाण...
पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले की कधी कधी हलका स्फोट होतो आणि गरम पाणी वर उसळी मारते...
स्टिमरवर देखील शंभर टक्के भरवसा ठेवणे जोखमीचे...
या सर्वाच्या जोडीला
बेसावधपणा सोबत असला की काय होते
याचे हे एक उत्तम उदाहरण...
अपघात हा अपघातच असतो अशी मांडणी करून चालत नाही...
ब-याचदा माहीती असूनही तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा बेसावधपणा कसा अंगाशी येतो याचे हे उत्तम उदाहरण...
स्नेहांकीत